गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा.. शिक्षकानेच केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथे घडली आहे. येथील शिक्षकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस अली आहे. या नराधम शिक्षकाला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, किनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका आश्रम शाळेत ही घटना घडली असून गणेश बोबडे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले आहे. बऱ्याच दिवसांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता.

परंतु सांगावे कसे आणि कोणाला हे तिला समजत नव्हते. अखेर शिक्षकाच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने तिच्या घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. गावात सर्वांना ही गोष्ट समजली तेव्हा लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी किनगाव पोलिसांत तक्रार केली असून. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ त्या नराधम शिक्षकास अटक केली आहे. तर पीडितेवर अहमदपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

You might also like