बिबवेवाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला (वय-१४) वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी देऊन तीच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार आरोपीच्या घरामध्ये नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला आहे.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67f18340-a475-11e8-9072-b1290028a150′]

संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा़ बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आई पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले. तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणास सांगू नये यासाठी त्याने पिडित मुलीला मोबाईल आणि पैसे दिले. तसेच माझ्याशी तू बोलली पाहिजे नाही तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली. या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सुतार अधिक तपास करीत आहेत.