नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काहीवेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B07G2948W3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff14e245-b9c3-11e8-936e-bd38cd4b2431′]

अत्याचार करणारा आरोपी अफसर सय्यद हा मुलीच्या घराशेजारीच राहतो. ३० ऑगस्ट रोजी मुलगी ही घराबाहेर खेळत असताना आरोपीने मुलीला उचलून आपल्या घराच्या छतावर नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शनिवारी सायंकाळी शारिरिक त्रास होऊ लागल्याने मुलीने झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या इतर नातेवाईकांना व परिसरातील नागरिकांना ही माहिती दिली. आरोपी घरीच असल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पिडित मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. ३० ऑगस्टपूर्वी दोन वेळेस आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.

या घटनेनंतर तोफखाना परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांना आज एका सभागृहात बैठक घेऊन या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी