बीसीसीआय सीईओविरुद्ध लैंगिक छळाची पुन्हा याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांची भारतीय क्रिकेट मंडळाचे लोकपाल डी. के. जैन यांनी पुन्हा लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच जोहरी यांना लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली मुक्त करण्यात आले होते.

ऑक्टोबरमध्ये ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत राहुल जोहरी यांच्यावर नोकरी देण्याच्या आमिषाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. जोहरी यांच्याविरुद्ध तीन महिलांनी तक्रार केली होती.

राहुल जोहरी यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या त्रिसदस्यीय समितीत अलाहबाद हायकोर्टाचे माजी न्यायाधीश राकेश शर्मा, दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा बरखा सिंह आणि सीबीआयचे माजी संचालक पीसी शर्मा यांचा समावेश होता. जोहरी यांच्या चौकशीच्यावेळी तीनपैकी एक जण अनुपस्थितीत राहिली होती.

या तीन सदस्यांच्या समितीने जोहरी यांना बहुमताने निर्दोष ठरवत समितीच्या प्रमुखांनी जोहरींना सीईओ म्हणून कायम ठेवले होते. यावर आक्षेप घेत या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी करणारी रश्‍मी नायर यांनी सादर केली आहे. यात राहुल जोहरी यांच्यावरील आरोपांची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Loading...
You might also like