धक्कादायक! पाद्रींकडून 175 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

वृत्तसंस्था : विविध चर्चच्या पाद्रींनी किमान १७५ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे पाद्री रोमन कॅथलिक चर्चच्या मेक्सिको शाखेशी संबंधित आहेत. यासंबंधी अंतरिक अहवाल प्रसिद्ध झाला असून एकच खळबळ उडाली आहे. यामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे.

या अहवालात मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी अतिशय धक्कादायक आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. सन १९४१ ते १६ डिसेंबर २०१९ पर्यंत झालेल्या अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकारांची माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सन १९४१ पासून आतापर्यंत एकूण ३३ पाद्रींनी किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. पीडित अल्पवयीन मुलांमध्ये ११ ते १६ वयोगटातील किशोरवयीन मुले आहेत. लैंगिक शोषण केलेल्या एकूण ३३ पाद्रींपैकी १८ पाद्री आजही विविध संघटनांमध्ये सक्रिय आहेत. मात्र, त्यांना जनता किंवा अल्पवयींन मुलांच्या संपर्कात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मॅसिएलचा मृत्यू
लीगनरीज ऑफ ख्राइस्टचा संस्थापक मार्शियल मॅसिएल यांनी तब्बल ६० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर पोप बेनेडिक्ट यांनी २००६ सालात त्यास मरेपर्यंत प्रार्थनेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा आदेश दिला होता. यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २००८ साली मार्शियल मॅसिएलचा मृत्यू झाला. आरोप केलेल्या लोकांना मॅसिएल कधीही सामोरा गेला नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/