मित्राच्या पत्नीसोबत लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पतीचा मित्र असल्याने घरात येऊन, जबरदस्तीने बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले. या सगळ्या प्रकारचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करून धमकी देवून वारंवार हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b507a2ef-8504-11e8-b01b-2f60bcf57d21′]

पोलिसांनी वैभव गुलाब नारनवरे (३४, रा. तुकारामनगर, मामुर्डी, किवळे) याला अटक केली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. ३० मार्च ते ९ जुलै २०१८ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. पतीची ओळख असल्याने तो घरी वारंवार येत होता. एकदा पती घरात नसताना तो आला. त्याने जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केला तसेच अनैसर्गिक कृत्य केले. याचे व्हिडिओ करून तो नेहमी महिलेस ब्लॅक मेल करून संबंध ठेवत हाेता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैभव याला अटक केली.