पुण्याच्या प्रसिद्ध शाळेतील शिक्षकाकडून 14 वर्षीय विद्यार्थ्यावर ‘लैंगिक’ अत्याचार, मास्तराला अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड भागातील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थ्यावर शाळेतील दुसऱ्या मजल्यावर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव नवनाथ गोरे (३१, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. प्रकरणी पीडित मुलाच्या पालकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीत मुलगा नववीच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी दुपारी पीटीचा तास सुरू होता. त्यावेळी शिक्षकाने पिडीत विद्यार्थ्याला स्वच्छतागृहात नेले. त्याठिकाणी कपडे काढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलगा घरी आला. शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने तो घरी येऊन रडू लागला. त्याच्याकडे पालकांनी विचारणा केल्यानंतर त्याने झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेतली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Visit : Policenama.com