SEX TIPS : सेक्स करताना ‘या’ गोष्टीचा वापर करा आणि परमोच्च आनंद मिळवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – असं म्हणतात की, सेक्सने त्या जोडप्यातील जवळीकता आणि आपापसातील प्रेम आणखी वाढण्यास मदत होते. त्यामुळे वैवाहीक जीवनातील सेक्सचे स्थान हे खूपच महत्त्वाचे स्थान आहे. कारण सेक्स हा परमोच्च आनंद देणारा असा वैवाहीक जीवनातील घटक आहे. त्यामुळे सेक्स नाते घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे जर तुमचे शारीरिक संबंध ठिक नसतील तर तुमच्या नात्यात दरी निर्माण होऊ शकते. अनेकदा असे होते की, सेक्सचा पुरेपूर आनंद भेटत नाही. मग नात्यात  भांडणाला सुरुवात होते. तुमती संतुष्टी मिळण्याची संधी आणखी वाढू शकते अशा एका आयडियाची आपण माहिती घेणार आहोत. एका सर्व्हेनुसार जर तुम्ही सेक्स करताना मोजे परिधान केले तर तुम्हाला सेक्सने जास्त संतुष्टी मिळण्याचे चान्सेस असतात.

काय म्हणतो सर्व्हे ?

सेक्स आणि त्यातून मिळणारे समाधान ज्याला आपण संतुष्टी असंही म्हणतो, त्यावर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. जर सेक्स करताना महिलेने पायात मोजे घातलेले असतील तर  आर्गेजमच्या आनंद मिळण्याची शक्यता अधिक वाढते असे या सर्व्हेतून समोर आले आहे.

सर्व्हेचा निष्कर्ष

सदरचा सर्व्हे हा नेदरलँडच्या गोनिन्जम युनिव्हर्सिटीद्वारे  करण्यात आला आहे. या सर्व्हे करताना अभ्यासकांना असे आढळले की, मोजे घालून सेक्स केल्याने सेक्स करणाऱ्या 80 टक्के जोडप्यांना ऑर्गेजमचा अनुभव आला.

मोजे घातल्याने नेमके काय होते ?

जेव्हा महिला पायात मोजे घालते तेव्हा मोज्यांमुळे शरीराची उष्णता कायम राहते. शिवाय पायांमधील रक्ताभिसरणही कायम राहतं. रक्ताभिसरण हे सेक्समध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे याचा फायदा हा होतो की, सेक्स करतेवेळी तुम्ही अधिक अॅक्टीव्हा राहता. त्यामुळे तुम्हाला सेक्सचा पुरेपूर आनंद मिळतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like