‘लैंगिक संबंधा’नंतर पुरुषांनी ‘या’ ४ गोष्टी आवर्जून कराव्यात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लैंगिक संबंधादरम्यान आणि त्याआधी काय करायचं हे प्रत्येक पुरुषाला माहीत असतं. परंतु लैंगिक संबंधानंतर काय करायचं हे जर पुरुषांना माहीत नसेल तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लैंगिक संबंधानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. काहींना याबाबत माहिती नसते. जर या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही तर संक्रमणाच्या समस्या उद्भवू शकतात.

१) स्वच्छतेवर लक्ष द्या – जर तुम्ही स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर वेगवेगळ्या संक्रमणांची शक्यता जास्त असते. त्यामुळे लैंगिक संबंधापूर्वी आणि संबंधानंतरही स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही कंडोमचा वापर करणार नसाल तर प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

२) लघवी नक्की करा – लैंगिक संबंधानंतर महिला लघवी करतात. कारण अनेकांना हे माहीत असते असं केलं नाही तर यूटीआयची समस्या निर्माण होऊ शकते. परंतु अनेक पुरुष लैंगिक संबंधानंतर लघवी करत नाहीत. यामुळे दोघांनाही संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे पुरुषांनीही लैंगिक संबंधांनंतर लघवी करणे गरजेचे आहे.

३) अधिक पाण्याचे सेवन – लैंगिक संबंधादरम्यान आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढत असतो. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे तुम्ही अधिक पाणी प्यायला हवं. यामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय पाण्याचा आणखी एक फायदा असा की, शरीरातील उष्णताही कमी होते.

४) झोप – लैंगिक संबंधानंतर झोप खूप महत्त्वाची आहे. कारण संबंधानंतर वॅसोप्रेसिन नावाचं हार्मोन मेंदूत रिलीज होतं. त्यानंतर मेंदू आराम करण्याचा संदेश देतो. या हार्मोन रिलीज होण्यामुळे रक्तवाहिन्याही मजबूत होतात. लैंगिक संबंधानंतर आराम केल्याने पु्न्हा एकदा शरीर नॉर्मल होण्यास मदत होते. त्यामुळे लैंगिक संबंधानंतर झोप महत्त्वाची भूमिका बजावते.

आरोग्यविषयक वृत्त –