नवीन धक्कादायक खुलासा ! ‘या’ कारणांमुळं कमी होतेय पुरुषांमधील लैंगिक संबंधांची इच्छा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या काही वर्षांपासून लोक मोाबाईल आणि इंटरनेटचा प्रचंड वापर करत आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातही अनेक बदल होत आहेत. आता एका रिसर्चमध्ये असा खुलासा झाला आहे की, या सगळ्यामुळं त्यांच्या लैंगिक जीवनावर परिणाम होताना दिसत आहे.

रिसर्चमध्ये दावा केलाय की…

हा रिसर्च अमेरिकेत करण्यात आला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, आधीच्या तुलनेत पुरुषांमधील सेक्स ड्राईव आता कमी होत आहे. याचं प्रमुख कारण गेमिंग, सोशल मीडिया आणि मोबाईल नेट आहे असं सांगण्यात आलं आहे.

चकित करणारे खुलासे

या रिसर्चमध्ये लैंगिक संबंध आणि त्याची इच्छा होणं याबद्दल लोकांना प्रश्न करण्यात आले. यात असा खुलासा झाला आहे की, साल 2000 नंतर अमेरिकन युवकांमध्ये लैंगिक संबंधांबद्दलचा रस कमी झाला आहे. हा रिसर्च जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रसिद्धथ करण्यात आला आहे.

लैंगिक निष्क्रियता वाढली

रिसर्चमध्ये असा खुलासा झाला आहे की, 25-34 वर्षांच्या पुरुष आणि महिलांमध्य लैंगिक निष्क्रियता वाढत आहे.

सोशल मीडिया हे कारण

संशोधक असं सागंत आहे की, रात्री करण्यासाठी लोकांकडे अनेक कामे आहेत. ते सेक्स सोडून सोशल मीडिया, इंटरनेट यावर अधिक वेळ घालवत आहेत. गेमिंगची क्रेजही याचं प्रमुख कारण आहे.