प्रेमात असताना शरीरसंबंध सहमतीने; तो बलात्कार नव्हे: उच्च न्यायालय

पणजी: वृत्तसंस्था
कोणत्याही पुरुषाला प्रेमसंबंधातून महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येणार नाही. असा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेदिला आहे. हा निर्णय योगेश पालेकर प्रकरणी सुनावला.एका महिलेला लग्नाची खोटी वचने देऊन बलात्कार केल्याचा आरोपाखाली सात वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

ही घटना २०१३ मध्ये घडली होती. योगेश एका कॅसिनोमध्ये शेफ म्हणून कार्यरत होता. तिथे एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. ‘योगेशने त्याच्या कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यासाठी घरी नेले आणि त्या दरम्यान दोघांमध्ये शरीरसंबंध निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी योगेशने ते घर सोडले. त्यानंतर तीन-चार वेळा शरीरसंबंध ठेवले,’ असा आरोप त्याच्यावर होता.

या प्रकरणानंतर योगेशच्या विरोधात तिने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर योगेशला सात वर्षे तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला असून,”योगेशला सुनावलेली शिक्षा रद्दबातल ठरवली आहे. संबंधित महिला योगेशला वेळोवेळी आर्थिक मदतही करत होती. योगेशने केवळ लग्नाच्या भूलथापा दिल्याने शरीरसंबंध ठेवले नाहीत, तर त्यांनी परस्पर सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते,”असं सुनावणी दरम्यान सिद्ध झाले.

या निर्णयामुळे ‘प्रेमसंबंधांतून निर्माण झालेले शरीरसंबंध हा बलात्कार होऊ शकत नाही,’ असा निर्णय न्यायालयाने देत योगेशला सुनावलेल्या शिक्षा रद्दबातल ठरवल्या.