लहान मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवून नराधमांनी केले लैंगिक शोषण

टिटवाळा : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी आत्तापर्यंत चार मुलींचे शोषण केल्याचे तपासात समोर आली असून त्यांनी चार मुली सोडून इतर मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. माधव मगर आणि विश्वनाथ तरणे असे अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहेत.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन नराधमांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. तपासात ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या दोन नराधमांनी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मात्र आत्तापर्यंत चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

नराधम मगर आणि तरणे हे दोघे टिटवाळा येथील एका शाळेसमोर समोसा-वडापाव विकतात आणि त्यांचे चायनिज सेंटर आहे. हे दोघे शाळेच्या वेळेत लहान मुलींना शाळेच्या परिसरात घेऊन जात आणि त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत होते. याशिवाय मुलींसोबत अश्लील चाळे देखील करत होते. दरम्यान एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करत असताना दिसले. त्या महिलेने तातडीने पीडित मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/