अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येला नवे ‘वळण’, मित्रानं केला ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेनं लोकप्रियता मिळवलेल्या सेजल शर्मानं नैराश्येमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहत्या घरीच तिनं गळफास घेऊन आतम्हत्या केली. तिनं सुसाईड नोटमध्येही लिहिलं आहे की, ती नैराश्येला कंटाळून आत्महत्या करत आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तिच्या जवळच्या मित्रानं नवीन खुलासा केला आहे.

सेजलचा कोस्टार आणि जवळचा मित्र निर्भय शुक्लानं सेजलच्या आत्महत्येबाबत एका मुलाखतीत खुलासा केला आहे. निर्भय म्हणाला, “सेजल तिच्या वडिलांची तब्येत ठिक नसल्यानं मागच्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होती. जेव्हा मी 15 नोव्हेंबरला तिला मेसेज केला होता. त्यावेळी तिनं वडिलांच्या इमर्जंसीसाठी उदयपूरला जात असल्याचं सांगितलं होतं. वडिलांना हार्ट अटॅक आल्याचंही तिनं सांगितलं होतं.”

View this post on Instagram

“𝑻𝒉𝒐𝒔𝒆 𝒔𝒑𝒆𝒄𝒊𝒂𝒍 𝒎𝒆𝒎𝒐𝒓𝒊𝒆𝒔 𝒐𝒇 𝒚𝒐𝒖 𝒘𝒊𝒍𝒍 𝒂𝒍𝒘𝒂𝒚𝒔 𝒃𝒓𝒊𝒏𝒈 𝒂 𝒔𝒎𝒊𝒍𝒆, 𝑰𝒇 𝒐𝒏𝒍𝒚 𝑰 𝒄𝒐𝒖𝒍𝒅 𝒉𝒂𝒗𝒆 𝒚𝒐𝒖 𝒃𝒂𝒄𝒌 𝒇𝒐𝒓 𝒋𝒖𝒔𝒕 𝒂 𝒍𝒊𝒕𝒕𝒍𝒆 𝒘𝒉𝒊𝒍𝒆, 𝑻𝒉𝒆𝒏 𝒘𝒆 𝒄𝒐𝒖𝒍𝒅 𝒋𝒖𝒔𝒕 𝒔𝒊𝒕 𝒂𝒏𝒅 𝒕𝒂𝒍𝒌 𝒂𝒈𝒂𝒊𝒏 𝒋𝒖𝒔𝒕 𝒍𝒊𝒌𝒆 𝒘𝒆 𝒖𝒔𝒆𝒅 𝒕𝒐 𝒅𝒐, 𝒀𝒐𝒖 𝒂𝒍𝒘𝒂𝒚𝒔 𝒎𝒆𝒂𝒏𝒕 𝒔𝒐 𝒗𝒆𝒓𝒚 𝒎𝒖𝒄𝒉 𝒂𝒏𝒅 𝒂𝒍𝒘𝒂𝒚𝒔 𝒘𝒊𝒍𝒍 𝒅𝒐 𝒕𝒐𝒐, 𝑻𝒉𝒆 𝒇𝒂𝒄𝒕 𝒕𝒉𝒂𝒕 𝒚𝒐𝒖’𝒓𝒆 𝒏𝒐 𝒍𝒐𝒏𝒈𝒆𝒓 𝒉𝒆𝒓𝒆 𝒘𝒊𝒍𝒍 𝒄𝒂𝒖𝒔𝒆 𝒎𝒆 𝒑𝒂𝒊𝒏, 𝑩𝒖𝒕 𝒚𝒐𝒖’𝒓𝒆 𝒇𝒐𝒓𝒆𝒗𝒆𝒓 𝒊𝒏 𝒎𝒚 𝒉𝒆𝒂𝒓𝒕 𝒖𝒏𝒕𝒊𝒍 𝒘𝒆 𝒎𝒆𝒆𝒕 𝒂𝒈𝒂𝒊𝒏” . . RIP Sejal.

A post shared by Nirbhay (@nirbhay_shuklaa) on

पुढे बोलताना निर्भय म्हणाला, “मागच्या काही काळापासून सेजलच्या वडिलांची तब्येत ठिक नव्हती. त्यांना कॅन्सर झाला होता. अशात हार्ट अटॅक आल्यानं ती मानसिकरित्या खचली असावी. ती तिच्या संपर्कात होतो. ती ठिक असल्याचं सांगत होती. परंतु ती ठिक नव्हती. तिचं डिप्रेशन वाढत गेलं. दरम्यानच्या काळात मी कामात बिजी होतो. जानेवारीमध्येच आमचं शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं. आमची मैत्रिण आणि कोस्टार आयशा कदुस्कर हिलाही ती भेटणार होती.”

सेजलची दिल तो हॅप्पी है जी ही मालिका ऑगस्ट 2019 पासून बंद झाली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर तिच्याकडे काम नव्हतं. तिचे वडिलही आजारी होते. यामुळे सेजल खूप डिप्रेशनमध्ये होती.

सेजल मीरा रोडच्या पूर्व भागातील शिवार गार्डनमध्ये रॉयल नेस्ट हाऊसिंग सोसायटीत सेकंड फ्लोअरवर मैत्रिणींसोबत रहात होती. सेजलचा को अ‍ॅक्टर अरू वी वर्मानं तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. “आपण गेल्या दीड महिन्यापासून नैराश्येत असून आत्महत्या करत आहोत यासाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये” असं तिनं आपल्या सुसाई़ड नोटमध्ये म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like