SGB Scheme | सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, येथे जाणून घ्या कधी होईल सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SGB Scheme | सोने हे गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचे सर्वात चांगले माध्यम आहे. एकीकडे कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आल्याने शेयर बाजारात भूकंप आला आणि आणि गुंतवणुकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर तुमच्याकडे स्वस्त सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या एसजीबी स्कीम (SGB Scheme) पाच दिवसासाठी खुली होणार आहे.

 

29 नोव्हेंबरपासून खुली होणार एसजीबी स्कीम
शेयर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणुकदार पुन्हा एकदा सोन्यात गुंतवणुकीकडे वळू शकतात, कारण यास एक सुरक्षित गुंतवणूक पर्यांय मानले जाते. सध्या सोने 48,466 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.

 

परंतु मोदी सरकारच्या (Modi Government) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond – SGB) स्कीम 2021-22 अंतर्गत तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. याबाबत आलेल्या एका रिपोर्टनुसार, ही योजना 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल.

 

गोल्ड बाँडची इश्यू प्राईज ठरली
रिपोर्टनुसार, एसजीबी योजनेत (SGB Scheme) गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 4,791 रुपये प्रति ग्रॅम ठरवली आहे. याबाबतची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22- सीरीज VIII सबस्क्रीप्शनसाठी 29 नोव्हेंबरपासून खुली होऊन 03 डिसेंबर 2021 ला बंद होईल.

 

ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना सूट
भारत सरकारने आरबीआयच्या (RBI) सल्ल्याने त्या गुंतवणुकदारांना नॉमिनल व्हॅल्यूवर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्याचा निर्णय सुद्धा निर्णय घेतला आहे, जे ऑनलाइन अर्ज करतील आणि अर्जासाठी पेमेंट डिजिटल मोडच्या (Digital Payment) माध्यमातून करतील.

अशा गुंतवणुकदारांसाठी गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोने ठेवले आहे. सीरीज VII ची इश्यू प्राईस 4,761 रुपये प्रति ग्रॅम सोने होती.

येथे खरेदी करू शकता गोल्ड बाँड
RBI भारत सरकारकडून हे गोल्ड बाँड जारी करते.
हे बाँड बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका सोडून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,
नॉमिनेटेड पोस्ट ऑफिसेस आणि मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड
आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या माध्यमातून विकले जातील.

 

2015 मध्ये सुरू केली होती ही स्कीम
SGB Scheme नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.
ही स्कीम सुरू करण्याचा उद्देश फिजिकल गोल्डची मागणी कमी करण्याचा होता.
बाँडचे दर सबस्क्रीप्शन कालावधीपूर्वीच्या आठवड्याच्या अंतिम 3 कामाच्या दिवसांसाठी
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून जारी केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद भावाच्या सिम्पल अ‍ॅव्हरेजच्या आधारावर ठरवल्या जातात.

 

Web Title :- SGB Scheme | Modi government sovereign gold bond scheme subscription opens from 29 november know here all details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले – ‘नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री की पहाटे?’

IND Vs SA | टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vaishali Agashe | LIC च्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली आगाशेंची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड