
SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम
नवी दिल्ली : SGB Scheme | सोने ही एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर मानले जाते. भारतातील लोक जुन्या काळापासून सोन्यात गुंतवणूक करणे चांगले मानतात, परंतु आता बदलत्या काळानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) ची तिसरी मालिका घेऊन येत आहे (SGB Scheme).
२०२२-२३ या आर्थिक वर्षातील हे तिसरे सुवर्ण रोखे आहेत. तुम्ही हे बाँड सोमवार म्हणजे १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२२ पर्यंत खरेदी करू शकता. या पाच दिवसात तुम्ही हे गोल्ड बाँड खरेदी करू शकता. या गोल्ड बॉण्डची इश्यू प्राईज आरबीआयने प्रति ग्रॅम ५,४०९ रुपये निश्चित केली आहे.
लवकरचा चौथा गोल्ड बाँड
सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB Scheme) हे सरकारी गॅरंटी बाँड (Government Guarantee Scheme) असतो. आत्तापर्यंत सरकारने या आर्थिक वर्षात एकूण दोन बाँड जारी केले असून तिसरा बाँड १९ डिसेंबर रोजी जारी केला जाणार आहे. यानंतर आरबीआय ६ ते १० मार्च २०२२ दरम्यान या आर्थिक वर्षातील शेवटचे बाँड जारी करेल.
ऑनलाइन शॉपिंगवर भरघोस सूट
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या या गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. या प्रणालीमध्ये डिजिटल मोडद्वारे पेमेंट करावे लागेल. बाँड डिजिटल पद्धतीने खरेदी केल्यास ५,४०९ रुपये प्रति ग्रॅम ऐवजी ५,३५९ रुपये प्रति ग्रॅम द्यावे लागतील.
एसबीजी खरेदी करण्याच्या अटी आणि कालावधी
आरबीआयच्या नियमांनुसार (RBI Rules), कोणताही भारतीय नागरिक सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकतो.
यात व्यक्ती तसेच कुटुंबे, विद्यापीठे, धार्मिक संस्थांमधील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात.
नियमांनुसार, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धार्मिक संस्था २० किलोपर्यंत सोने खरेदी करू शकतात.
त्याच वेळी, एक व्यक्ती ४ किलोपर्यंत सोने खरेदी करू शकते. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना सरकारकडून वार्षिक आधारावर २.५० टक्के व्याज मिळू शकते. या योजनेचा एकूण कालावधी ८ वर्षांचा असेल, परंतु ५ व्या वर्षानंतर तुम्ही पुढील व्याज मिळण्याच्या तारखेपासून बाहेर पडू शकता.
कुठे खरेदी करू शकता सॉव्हरेन गोल्ड बाँड
कोणतीही सरकारी बँक किंवा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिसमधून आरबीआयचा
हा सॉव्हरेन गॉल्ड बाँड खरेदी करू शकता. याशिवाय, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड
आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून ते खरेदी करू शकता.
Web Title :- SGB Scheme | sovereign gold bond scheme open from 19 december know details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Retinal Age Gap | डोळ्यांच्या रेटिनाद्वारे समजू शकते किती आयुष्य आहे तुमचे – स्टडी