हॉस्पीटलमध्ये शबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले – ‘ICU मध्ये 48 तास निगराणी खाली राहणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या होत्या. अपघाताची बातमी ऐकताच बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता सतीश कौशिकही शबाना यांची तब्येत जाणून घेण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (केडीएएच) पोहोचले. शबाना यांना पाहिल्यानंतर सतीश यांनी सांगितले की, पुढच्या 48 तासापर्यंत त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर शबाना यांची कार एका ट्रकला धडकली. या प्रकरणी ट्रक चालकाने शबाना यांच्या ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाचा आरोप आहे की, शबाना यांचा ड्रायव्हर वेगाने कार चालवत होता. त्याने ट्रकला धडक दिली. त्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला.

सतीश कौशिक म्हणाले की, ‘शबाना सध्या आईसीयूमध्ये आहेत. काल 10 वाजता मी हॉस्पिटलमध्ये पोहलचो. पण शबाना यांना भेटू शकलो नाही. त्यांना डोळ्यांभोवती दुखापत झाली आहे. पुढील 48 तास त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. ते लवकरच ठीक होतील.’

अभिनेता सतीश कौशिक या घटनेवर बोलताना म्हणाले की, महामार्गावर कमी वेगाने वाहने चालविणे खूप महत्वाचे आहे. मी नेहमी माझ्या ड्रायव्हरला गाडी हळू चालविण्यास सांगत असतो.

मिळालेल्या माहितीसनुसार, रविवारी संध्याकाळी सहा वाजता शबाना आझमी यांना अल्ट्रासोनोग्राफीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना मानेच्या भागात दुखापत झाली आहे. तब्बू, अनिल कपूर इत्यादी सेलेब्स शबाना यांना पाहण्यासाठी केडीएच हॉस्पिटलमध्ये आले होते.

फेसबुक पेज लाईक करा –