वाढदिवस विशेष शबाना आझमी

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आज ‘वुमन इन सिनेमा’ असा किताब मिळवलेल्या सुप्रसिद्ध नायिका शबाना आझमी यांचा वाढदिवस. १८ सप्टेंबर १९५० रोजी हैद्राबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सुप्रसिद्ध कवी कैफी आझमी हे होत. सुप्रसिद्ध उर्दू कवी जावेद अख्तर यांच्या त्या पत्नी आहेत. १९७३ साली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. १९७४ साली प्रसिद्ध झालेला, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंकुर’ ह्या सिनेमातून त्यांनी मोठया पडद्यावर पदार्पण केलं. लवकरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून लौकीक मिळवला. त्यांना ‘सर्वोत्कृष्ट नायिका’ म्हणून पाच नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.
[amazon_link asins=’B00NFJGUPW,B073JPC6R3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe840ce5-baf9-11e8-a372-430e613a1cd5′]

शबाना आझमी यांनी आपल्या प्रतिभेला मुख्यतः ‘समांतर सिनेमांतून’ वाव दिला. समांतर सिनेमा ही १९५० नंतर चित्रपट सृष्टीत भारतात सुरु झालेली एक महत्त्वाची चळवळ आहे. बंगाली सिनेमांतून सत्यजित राय यांनी त्याची सुरुवात केली असं म्हणता येईल. पैसे कमावू बॉलीवूडी सिनेमांना हे सिनेमा पर्याय देत होते. समाजातील ज्वलंत विषय मांडत होते. समाजाची काळी, बघावीशी न वाटणारी बाजू दाखवत होते. थोडक्यात ही चळवळ ‘नव-वास्तववादी'(Neo-Realist) स्वरूपाची होती. या सिनेमांना शासनानेही आश्रय दिला होता.

अशा प्रकारच्या हटके सिनेमांतून आझमी यांनीआपली प्रतिभा व्यक्त केलेली आहे. तसेच मुख्य प्रवाहातील सिनेमांतूनही त्यांनी यश मिळवले आहे. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्या सामाजिक सेवेमध्येही योगदान देताना दिसतात.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11813224-bafa-11e8-936e-bd38cd4b2431′]

आझमी यांचे काही चित्रपट- अंकुर, अर्थ, पार, गॉडमदर, खंडर, स्वामी, अर्थ, भावना, स्पर्श, थोडीसी बेवाफाई, मासुम, अवतार, मंडी, मकडी, तेहजीब, इ. असे खूप सारे सिनेमे आपण यु ट्यूब वर बघू शकतो.

हिंदी चित्रपट सृष्टीतील ग्रेट नायिका शबाना आझमी यांना पाेलीसनामाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…