Shafaq Naaz Happy Birthday | महाभारत मधल्या कुंती भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीने दिले होते 250 वेळा ऑडिशन; आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री शफक नाज (Shafaq Naaz Happy Birthday) ही नुकताच तुनिशा शर्मा या केस मध्ये अडकलेला अभिनेता शीजान खान याची बहिण असून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. आज शफक ही तिचा वाढदिवस साजरा करत आहे. शफकचा जन्म राजस्थान मध्ये 7 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. आज शफकच्या (Shafaq Naaz Happy Birthday) वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी.

शफक ही अनेक अथक प्रयत्नांनी अभिनय क्षेत्रात तिने पाऊल ठेवत यशस्वी झाली आहे. मात्र अजूनही तिला तिच्या प्रयत्नांप्रमाणे प्रसिद्धी मिळाली नाही. तुनिशा शर्मा केस मध्ये अडकलेला शीजान खान याची बहीण म्हणून ती नुकतीच ओळखली जाऊ लागली. शफकचा जन्म राजस्थान मध्ये जरी झाला असला तरी तिने तिच्या आजीकडे मेरठमध्ये आपले लहानपण घालवले आहे. 2017 मध्ये देखील शफक चर्चेत आली होती ते म्हणजे तिने काढलेल्या टॅटूमुळे. शफक ही आपल्या आईवर अत्यंत प्रेम करते याचाच प्रत्येय तिने टॅटूच्या माध्यमातून दाखवून दिला होता. शफकच्या मते आपली आई नेहमी आपल्या सोबत असायला पाहिजे यासाठी तिने हा टॅटू काढला होता. शफकची अभिनयाची सुरुवात सरोज खान यांच्या डान्स अकॅडमी मधून झाली आहे. सरोज खानने पहिल्यांदाच शफकला पाहताच मुंबईला जाण्याचा सल्ला दिला होता.

यानंतर सरोज खानच्या सांगण्यानंतर शफक (Shafaq Naaz Happy Birthday) मुंबईला रवाना झाली
आणि ‘सपना बाबुल का… बिदाई’ या मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने आहट, क्राइम पेट्रोल,
ये इश्क या अनेक मालिकांमधून दिसून आली. मात्र सर्वात जास्त प्रसिद्धी तिला स्टार प्लस वर आलेल्या महाभारत
मधील कुंती या भूमिकेने मिळाली होती. या भूमिकेने तिचे भरभरून कौतुक झाले होते.
या भूमिकेबाबत एका मुलाखतीमध्ये बोलताना शफकने सांगितले होते की या भूमिकेसाठी तिने जवळपास 250
वेळा ऑडिशन दिले होते. त्यानंतरच तिला या भूमिकेसाठी घेण्यात आले.

Web Title :- Shafaq Naaz Happy Birthday | bollywood birthday special shafaq naaz sheezan khan sister career serials mahabharat kunti tunisha sharma

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’