जेव्हा शाहरूख म्हणाला होता गौरीला की बुरख्या शिवाय काहीच परिधान नाही करायचं, मजेदार आहे किस्सा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्यांचे नाव बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत आणि सुंदर जोडप्यांमध्ये आहे. 29 वर्षांनंतरही त्यांच्या केमिस्ट्रीची जादू तशीच आहे. पण या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित एक किस्सा आहे, जो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. स्वत: शाहरुखने याविषयी सांगितले. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार त्याने गौरीला लग्नानंतर लगेच बुरखा घालण्याचा आदेश दिला होता.

या किस्स्याबद्दल शाहरुख म्हणतो – मला अजूनही आठवते की गौरीचे कुटुंब थोड्या जुन्या विचारांचे होते. मी त्यांच्या तत्त्वांचा आदर करतो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा काही लोक म्हणत होते की हा एक मुस्लिम मुलगा आहे. हा मुलीचे नाव बदलेल ? गौरी मुसलमान होईल का? शाहरुखच्या म्हणण्यानुसार, कुटूंबाची ही धारणा पाहून त्याने एक गंमत करण्याचा निर्णय घेतला. त्याने गौरीला बुरखा घालून नमाज पठण करण्यास सांगितले. याबद्दल तो सांगतो – मी गौरीला बुरखा घालायला सांगितले आणि तिला नमाज पठण करायला सांगितले. हे पाहून कुटुंबीय विचार करू लागले की मी गौरीचे धर्मांतर तर केले नाही ना.

अभिनेता पुढे म्हणतो – मी संपूर्ण कुटुंबासमोर सांगितले की आजपासून गौरी फक्त बुरखा घालेल, ती घराबाहेर पडणार नाही आणि तिचे नावही गौरीपासून आयशा असे बदलले जाईल. हे पाहून आता कुटुंब दंग झाले. पण जेव्हा तणाव वाढत असल्याचे जाणवले तेव्हा स्वत: शाहरुखने तो विनोद करत असल्याचे उघड केले. हे पाहून संपूर्ण कुटुंब हसू लागले. दरम्यान, शाहरुख खान आणि गौरी एकमेकांच्या धर्माचा पूर्ण आदर करतात. शाहरूखनेही त्यांच्यावर आपला धर्म लादलेला नाही किंवा गौरीने असा प्रयत्न केलेला नाही. दोघांनी नेहमीच प्रत्येक धर्म समान मानला आहे.

You might also like