जेव्हा फ्रेंड्ससोबत पार्टीला जायची पत्नी गौरी खान, घरी राहून Babysitting करायचा किंग खान !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारताना दिसला. परंतु चकित करणारी बाब अशी की, त्याला कोणीच ओळखलं नाही. शाहरुख खान त्याच्या पठाण (Pathan) सिनेमाच्या शुटींगमधून ब्रेक घेऊन राईडवर जातानाही दिसला होता. शाहरुख आज एक सुपरस्टार असला तरी त्यानं कुटुंबालाही वेळ दिला आहे. एक वेळ असा होता जेव्हा शाहरुखनं Babysitting (बेबीसिंटींग- घरी राहून मुलांची काळजी घेणं) देखील केलं आहे.

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शाहरुख खान लंडनमध्ये होता. एका रिअ‍ॅलिटी शोमधून समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा गौरी खान तिच्या दोस्तांसोबत पार्टी करायला जात असे तेव्हा शाहरुख घरी राहून बेबीसिटींग करत असे. संजय कूपरची पत्नी महीप कपूर हिनं एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये सांगितलं की, गौरी खान, भावना पांडे, नीलम कोठारी आणि इतर मैत्रिणी सोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या आणि शाहरुख खान घरी बेबीसिटींग करत होता.

महीपनं सांगितलं की, आम्ही सर्व आमची मुलं शाहरुखकडे सोपवून जात असे. जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा शनाया रडत होती. कारण शाहरुख स्वत:साठी शॉपिंग करत असे. मग महीप परत आल्यानंतर शनायाला शॉपिंग साठी नेत असे.

अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सुहाना खान या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी खूप वेळ सोबत घालवला आहे. तिघींचे एकत्र फोटोही सोशलवर अनेकदा व्हायरल होताना दिसले आहेत.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे.

You might also like