Video : ‘पठाण’च्या शूटिंगमधून ब्रेक घेत बोट राइडवर निघाला ‘किंग’ खान !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारताना दिसला. परंतु चकित करणारी बाब अशी की, त्याला कोणीच ओळखलं नाहीच त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो बोट राईडवर जाताना दिसत आहे.

अशी माहिती आहे की, शाहरुख खान त्याच्या पठाण (Pathan) सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन राईडवर निघाला होता. तो एका स्पीड बोटमधून अलिबागच्या दिशेनं गेला. सध्या शाहरुखच्या बोट राईडचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं राखाडी रंगाची हुडी, व्हाईट टी शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊजर घातली होती. त्यानं यावेळी मास्क आणि सनग्लासेसदेखील लावले होते.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की, राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाणमध्ये दिसणार आहे.