‘किंग’ खानची लाडकी सुहानाचे रडतानाचे फोटो सोशलवर व्हायरल ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसली होती. सुहानानं आपल्या घरीच आपला बेली डान्स क्लास सुरू केला होता ज्यातून ती ऑनलाईन बेली डान्सचे धडे घेत होती. सुहाना आपल्या फोटोंमुळं आणि व्हिडीओंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

सुहानानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आहेत. खास बात अशी की सुहाना यात रडताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. सुहाना लिहिते की, “अभिनंदन जर तुम्ही मला रडतान कधी पाहिलं नसेल तर…. क्वरांटाईन फिल्मिंग.”

सुहानाच्या कॅप्शनवरून असं वाटत आहे की, ती घरी तिच्या प्रोजेक्टसाठी शुट करत असावी. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/B-XCUqTHC6r/

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/