‘पठाण’चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट अबुधाबीत होणार, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमची साथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आपला आगामी सिनेमा ‘पठाण’ मुळे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच त्याने मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. आता सिनेमाची टीम शूटिंगच्या दुसऱ्या शेड्यूलसाठी अबुधाबीला रवाना होणार आहे.

एका वृत्तानुसार, सिनेमाचे पुढील शेड्यूल नवीन वर्षात जानेवारीत अबुधाबीमध्ये शूट केले जाणार आहे. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण एकत्र शूटिंग करणार आहेत.

अबुधाबीमध्ये ‘पठाण’चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट केले जाणार आहे. यानंतर सिनेमाची टीम यूकेला जाईल जिथे चित्रपटाच्या काही सीन्स शूट करणार आहेत. जुलैपर्यंत मुंबई सिनेमाचे शूट पूर्ण करण्याचे निर्मात्यांचे नियोजन आहे. पठाणमध्ये शाहरुख खान दोन लुकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या तो लांब केस असलेल्या लुकमध्ये शूटिंग करत आहे, तर पुढच्या शूटसाठी तो केस लहान करणार आहे. ही एका गुप्तहेराची कथा आहे. सिनेमाच्या केंद्रस्थानी भलेही शाहरुख खान आणि त्याची भूमिका असेल, पण दीपिका या मिशनमध्ये शाहरुखची साथ देणार आहे.