किंग खान शाहरूखनं 2 वर्षांच्या ब्रेकनंतर ‘साइन’ केले 3 प्रोजेक्ट, ‘या’ चित्रपटात असेल डबल रोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. झिरोच्या अपयशानंतर शाहरुखने ब्रेक घेतला आणि तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. पण आता शाहरुखच्या सर्व चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या अभिनेत्याने एक नव्हे तर तीन चित्रपट साइन केले आहेत. असे सांगितले जात आहे की, अभिनेता पठाणशिवाय राजकुमार हिरानी आणि साउथ फिल्ममेकरसोबत चित्रपट करणार आहेत.

शाहरुख पुन्हा डबल भूमिकेत दिसणार आहे

एका न्यूज पोर्टलनुसार, शाहरुख खानने पहिल्यांदाच साउथ डायरेक्टर एटलीशी हातमिळवणी केली आहे. तो त्यांच्या चित्रपटात डबल भूमिका साकारणार आहे. होय, डुप्लिकेट आणि डॉननंतर शाहरुख तिसऱ्यांदा डबल रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख बाप आणि मुलगा दोघांचीही भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात जनरेशन गॅपवाल्या मुद्द्यावर जोर देण्यात येईल. यात असे दर्शविले जाईल की, जनरेशन गॅपमुळे वडील आणि मुलगा दोघे एकमेकांविरूद्ध कसे उभे राहतात. चित्रपटात शाहरुख रॉच्या वरिष्ठ एजंटची भूमिका साकारणार आहे. त्याला त्याच्या गुंड मुलाला पकडण्यासाठी मिशनवर पाठविले जाते. चित्रपटाविषयी असे बोलले जात आहे की, शाहरुख खानच्या मेकअपवर खूप जोर दिला जाईल. त्याला वडील म्हणून दर्शविण्यासाठी कृत्रिम चा वापर केला जाईल.

पठाणमध्ये दिसेल अ‍ॅक्शन अवतार

असं म्हटलं जात आहे की, शाहरुख खान पुढच्या वर्षाच्या मध्यात एटलीच्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकेल. शाहरुख सध्या ‘पठाण’ या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे. पहिल्यांदाच शाहरुख आणि जॉन अब्राहम एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट रिवेंज ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात बर्‍यापैकी अ‍ॅक्शन पहायला मिळणार आहे.

You might also like