‘पठाण’च्या सेटवरील ‘किंग’ खानचा लुक व्हायरल ! लांब केस अन्…

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारताना दिसला. परंतु चकित करणारी बाब अशी की, त्याला कोणीच ओळखलं नाही. शाहरुख खान त्याच्या पठाण (Pathan) सिनेमाच्या शुटींगमधून ब्रेक घेऊन राईडवर जातानाही दिसला होता. अलीकडेच शाहरुख यशराज स्टुडिओ च्या बाहेर स्पॉट झाला. यावेळी तो नवीन लुकमध्ये दिसला. लांब केस आणि फ्रेंच दाढी अशा प्रकारे शाहरुख खानचा नवीन लुक पहायला मिळाला. असं सांगितलं जात आहे की, शाहरुख खानचा हा लुक पठाण सिनेमातील लुक आहे.

समोर आलेले शाहरुखचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही शाहरुखचा हा लुक आवडला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक कलरची लोअर घातलेली दिसत होती. यात शाहरुख खूपच शानदार दिसत होता. सध्या त्याच्या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे. लांब केसवाल्या लुकमध्ये शाहरुख खूप वेगळा दिसत आहे.

चाहत्यांनाही शाहरुखचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याचे हे फोटो शेअरही केले आहेत.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे.

You might also like