शाहरुख खाननं नकली ‘मिशी’ लावून पत्नी गौरीसोबत केला हटके ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ज्या कार्यक्रमात पोहोचतो त्या कार्यक्रमात त्याचा लूक वेगळा असतो. अलीकडेच तो अरमान जैन आणि अनीसा मल्होत्राच्या लग्नासाठी पोहचला होता. ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या ‘कजरारे’कजरारे’ या गाण्यावर शाहरुख खानने आपली पत्नी गौरी खान आणि करण जोहरसोबत डान्स केला. ‘बंटी और बबली’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी काम केले होते. त्याचबरोबर  ऐश्वर्या रायने ‘कजरारे कजरारे’ या गाण्यावर आयटम सॉंग केले होते.

https://www.instagram.com/p/B8LRKxFhDsB/?utm_source=ig_embed

शाहरुख आणि गौरीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या डान्स परफॉरमेंसमध्ये शाहरुख खान खोट्या मिश्या लावून नाचताना दिसत आहे. या व्हिडिओशिवाय आणखी एक व्हिडिओदेखील शेअर केला गेला आहे ज्यात शाहरुख आणि गौरी सड्डी गली सॉंगवर नाचत आहेत.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तो ‘झिरो’ चित्रपटापासून तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. वर्ष 2019 मध्ये त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि आता त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या घोषणेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मात्र, यावर्षी शाहरुख खान कोणत्याही चित्रपटाची घोषणा करतो की नाही हे पाहावे लागेल. किंग खान मात्र सतत सक्रिय असतो आणि पडद्यामागे काम करत असतो.

जेव्हा शाहरुख खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले तेव्हा अभिनेत्याने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण कुटुंबासह सुट्टीवर गेला. यानंतर शाहरुख परत आला तेव्हा तो मोठ्या पडद्यावर नव्हता तर छोट्या पडद्यावर तो शोमध्ये नक्कीच दिसला. याशिवाय त्याने कॅमेर्‍याच्या मागे काम केले आहे. त्याचा मित्र करण जोहर म्हणतो की शाहरुख सेल्फ एनालिसिससाठी वेळ घेत आहे.