Shah Rukh Khan Injured | शुटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी; रक्तस्त्राव रोखण्यासाठी करावी लागली शस्त्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान याला चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. (Shah Rukh Khan Injured) यामुळे रक्तस्त्राव देखील झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने शाहरुखची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Shah Rukh Khan Injured) आता तो घरी बसून रिकव्हर होण्याच्या प्रयत्नात आहे.

अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस (Los Angeles,USA) येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार शुटिंगदरम्यान सेटवर शाहरुखचा अपघात झाला. त्यानंतर शाहरुखच्या नाकावर दुखापत झाली. शाहरुखच्या टीमने त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी काळजीचे कारण नसल्याचे सांगत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शाहरुखची नाकावर (Shah Rukh Khan Surgery) शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्या नाकाला पट्टी बांधण्यात आली आहे. अभिनेता शाहरुख खान शस्त्रक्रियेनंतर भारतात परतला असून सध्या तो घरी आहे. शाहरुख घरी रिकव्हर होत आहे. याबाबत त्याने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.

शुटिंग दरम्यान अनेकदा अभिनेता शाहरुखला दुखापत झालेली आहे. (Shah Rukh Khan Injured) यापूर्वीही चित्रिकरणामध्ये त्याचा अपघात झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली आहे. रईस (Raees) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुखला सेटवर गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे 2017 साली त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याआधी 2013 मध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’चे (Chennai Express) शूट पूर्ण झाल्यानंतर शाहरुखने शस्त्रक्रिया केली होती. याशिवाय शाहरुख खानला 2009 मध्ये त्याच्या डाव्या खांदा व्यवस्थित काम करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. यावेळेस त्याच्या नाकावर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया झाली आहे. शाहरुखचा चाहता वर्ग यामुळे दुखीत झाला असून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत. शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट (Jawan Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title : Shah Rukh Khan Injured | shah rukh khan meets with on set accident returns to mumbai after surgery in us

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’