शाहरुख खान ‘या’ अभिनेत्याला म्हणतोय, “सर घरी या सापशिडी खेळूयात”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील त्याच्या वडिलांची भूमिका करणारे अनुपम खेर यांना भारतात आल्यावर सापशिडी खेळूयात अस आमंत्रण दिले आहे. अनुपम खेर सध्या न्यूयॉर्क मध्ये आहेत. अनुपम खेर यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी शाहरुख खानला मिस करण्याबाबत लिहिलं होतं. यासोबतच खेर यांनी दिलवाले दिल्हनिया ले जाएंगे मधील एका सीनचा व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. शाहरुखने अनुपम खेर यांच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे.

अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये शाहरुख खानला उद्देशून म्हटले होते की, “माझ्या प्रिय शाहरुख खान !! बस असंच !! न्यूयॉर्कमध्ये अचानक तुझी आठवण आली. आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. नंतर आपण अचानक मोठे झालो. खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद.” अनुपम खेर आणि शाहरुख खान यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यात डर आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ही काही प्रमुख नावं आहेत.

अनुमप खेर यांच्या या ट्विटला शाहरुख खानने खूप खास अंदाजात उत्तर दिलं आहे. शाहरुख आपल्या रिप्लायमध्ये म्हणतो की, “अहो नाही पप्पा कूल ! ग्रो अप होवोत तुमचे दुश्मन. आपल्या दोघांचे हृदय म्हणजे बाळ आहे. सर घरी या सापशिडीपासून सुरुवात करुयात. हवेत पूल बांधूयात. मिस यू” शाहरुखचा नकताच झिरो हा सिनेमा येऊन गेला आहे. त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा होऊ शकतो. सध्या शाहरुख खानचा पूर्ण फोकस त्याची टी केकेआर वर आहे जी सध्या आयपीएलमध्ये चांगलं खेळत आहे.

 

Loading...
You might also like