मराठी चित्रपटाच्या ‘ट्रेलर’ लॉंचिंगला आलेल्या ‘किंग’ शाहरुखने खुलेआम ‘उतरवली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘जीरो’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेता शाहरुखने कोणत्याच चित्रपटात काम न करण्याचे सांगितले होते. नुकत्याच एका शोमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली. शाहरुख आपल्या फॅशन फ्रेंड विक्रम फडणीसने दिग्दर्शन केलेला मराठी चित्रपट ‘स्माइल प्लीज’ चा ट्रेलर आणि गाणे लॉंच करण्याच्या निमित्ताने तो आला होता. हसत शाहरुखने विक्रम फडणीसचे चित्रपटाबद्दल कौतुक केले व आपल्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा ही दिल्या.

शाहरुख विक्रमला म्हणाला की, तुम्ही किती ही मोठा निर्णय घेणारे व्यक्ती जरी असला तरी आपल्याच कार्यक्रमात गोल्डन कलरची टाय घालून कसे काय येऊ शकता ? विक्रमला या गोष्टींचा कधीच अंदाज आला नव्हता की, शाहरुख खान सगळ्यांसमोर त्याची खिल्ली उडवेल. अशामध्ये विक्रमने लगेचच आपली टाय काढली आणि प्रेक्षकांकडे टाकली.

त्याचदरम्यान शाहरुखने हसून विक्रमला मिठी मारली आणि म्हणाला की, हा फक्त जोक होता पण शाहरुखने त्याची खिल्ली उडविणे चालूच ठेवले आणि विक्रमला म्हणाला, या टायला पुन्हा घालू नकोस. तु असाच चांगला दिसतो. जर तु एवढा चांगला दिसतो. तर तुला टाय घालायची गरज काय ?

शाहरुखने ‘स्माइल प्लीज’ चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला की, ‘इथे आल्यावर मी विक्रमला सगळ्यात पहिले विचारले की, तु एक चांगला चित्रपट बनवला आहे का ? जर तुला चित्रपट बनवायचा असेल तर चित्रपट बनवताना एक्शन व कॉमेडी चित्रपट बनव.’ यावर विक्रमने उत्तर दिले की, ‘मी हा चित्रपट खूप मनापासून बनवला आहे. मला वाटते की, मनापासून केलेला चित्रपट सगळ्यात बेस्ट असतो.’

मोठ्या-मोठ्या बॉलिवूड कलाकारांचे कपडे डिजाइन केलेले विक्रम फडणीसने दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट ‘हृदयांतर’ होता. त्यांचा दूसरा चित्रपट ‘स्माइल प्लीज’ आहे. जो १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, प्रसाद ओक आणि ललित प्रभाकर सारखे प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

You might also like