एका वर्षानंतर ‘या’ सिनेमातून ‘वापसी’ करण्यासाठी ‘किंग’ खान ‘रेडी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून सिनेमांपासून गायब आहे. गेल्या एका वर्षात त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. आनंद एल राय यांच्या झिरो या सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल पडला. या सिनेमानंतर त्यांना सिनेमांपासून अंतर ठेवलं. परंतु आता मात्र शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

डायरेक्टर राज निदिमोरू आणि कृष्णा डीकेच्या आगामी सिनेमात शाहरुख खान ?
समोर आलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान राज निदिमोरू आणि कृष्णा डीकेसोबत एक सिनेमा करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार सिनेमाची स्क्रिप्ट पाहिल्यानंतर शाहरुखनं लगेचच या सिनेमासाठी होकार दिला होता. शाहरुख या सिनेमासाठी खूप उत्साहित आहे. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालं तर या सिनेमाची शुटींग याचवर्षी होण्याची शक्यता आहे.

राज निदिमोरू आणि कृष्णा डीके स्त्री, शोर इन द सिटी यांसारख्या सिनेमांसाठी ओळखले जातात. आता त्यांचा किंग खान सोबत टीमअप करणं चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. किंग खान प्रत्येक स्क्रिप्ट विचार करून निवडत असतो. आता डायरेक्टर निदिमोरू आणि कृष्णा डीके शाहरुख खानची बॉलिवूड वापसी करवून घेतात किंवा हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.