‘किंग’ खान शाहरूखच्या बहिणीचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाॅलिवूड सुपरस्टार शहारुख खानची चुलत बहीण नूर जहां याचे पाकिस्तानातील पेशावर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. याबद्दल नूर जहां यांचा छोटा भाऊ मंसूर अहमदने माहिती दिली आहे. नूर जहां या अनेक दिवसांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनूसार, नूर जहां या पाकिस्तानातील पेशावर येथील मोहल्ला शाह वली कतल परिसरात राहत होत्या. नूर जहांचे शेजारी आणि नगर परिषदेचे माजी सदस्य जुल्फिकार यांनीही नूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नूर जहां राजकारणात सक्रिय होत्या

नूर जहां तेथील राजकारणात सक्रिय होत्या. त्या नगरसेवक होत्या. शाहरुख खान आणि नूर जहां यांच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. त्या शाहरुख खान ला भेटण्यासाठी दोन वेळा भारतात आल्या होत्या तर लहानपणी शाहरुख खान देखील त्यांना भेटायला पाकिस्तानला गेला होता. नूर जहां ही शाहरुख खानच्या वडिलांच्या चुलत भावाची मुलगी होती.

फेसबुक पेज लाईक करा