Shah Rukh Khan | शाहरुखने केला 4 वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचा खुलासा; म्हणाला “सुहानाने मला…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shah Rukh Khan | बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेला शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून कमबॅक करणार आहे. जवळजवळ 4 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुखने कोणत्याच चित्रपटात काम केलं नव्हतं. तसेच कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. याबद्दल शाहरुख खानला विचारले असता, त्याने मुलगी सुहानाचं नाव घेतलं आणि ४ वर्षे ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. (Shah Rukh Khan)

 

काय म्हणाला शाहरुख खान ?
शाहरुख खानने नुकतीच सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला याबद्दल विचारले असता, त्याने 4 वर्षे कामातून ब्रेक घेण्याचं कारण मुलगी सुहाना असल्याचं स्पष्ट केलं. शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या भेटीला येणार आहे, तर त्याची मुलगी सुहानादेखील लवकरच बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे. सुहाना जोया अख्तरच्या ‘द आर्चिज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Shah Rukh Khan)

शाहरुख खान म्हणाला की, “सुहानाने मला कधीच कॉल केला नाही आणि मी कोणताही चित्रपट साइन केला नाही.
मी हाच विचार करत राहिलो की, कदाचित ती मला कॉल करेल. आज करेल, नंतर करेल.
शेवटी मग एक दिवस मी तिला फोन केला आणि तिला म्हणालो, “आता तरी मी माझं काम सुरू करू शकतो का?”
त्यावर तिने मला विचारलं, “तुम्ही काम का करत नाहीत?” मी म्हणालो,
“मला वाटलं न्यूयॉर्कमध्ये तुला एकटं वाटलं तर तू मला फोन करशील आणि त्यावेळी मी तुझ्याबरोबर असायला हवं.”
म्हणून मी कोणताही चित्रपट साइन केला नाही. सुहाना लवकरच ‘द आर्चिज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हा चित्रपट 2023 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सुहानाचा हा चित्रपट हिट ठरतो, की फ्लॉप हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Shah Rukh Khan | shah rukh khan opens up about 4 years acting break says suhana is the reason for break

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा