Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलीवूडचा किंगखान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. 4 वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान हा रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. 25 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. सिनेमा दोन दिवसांनंतर प्रदर्शित होणार असल्यामुळे किंग खान (Shah Rukh Khan) याच्यासह चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा सुरु असताना किंग खान यांने ट्राफिक नियंत्रणात आणणाऱ्यांची माफी मागितली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शाहरुखनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्ये एक लाल गाडी थांबलेली दिसत आहे. या व्हिडीओला शाहरुखनं (Shah Rukh Khan) कॅप्शन दिलं,” ‘या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो. सॉरी पण आशा करतो की, लाल गाडीवाल्यांनी सीट बेल्ट लावला असेल. आता आपण थिएटरमध्ये भेटूया, पठाणचं तिकीट बुक करा.’ सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील
काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत.
सिनेमा 25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे.
प्रदर्शनापूर्वी मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री झाल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत
मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :-  Shah Rukh Khan |shah rukh khan surprises fans outside mannat greets them signature pose share post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Benefits of Ragi in winter | हिवाळ्यात नाचणीचा वापर केल्यास दूर होते सांधेदुखी, इतर ४ फायदे जाणून घ्या