Shah Rukh Khan | अभिनेता शाहरुख खानच्या ‘त्या’ वक्तव्याचे सर्वत्र होत आहे कौतुक; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या बॉलीवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या ‘पठाण’ चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आज पठाणने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. शाहरुख आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने वेळोवेळी जिंकत असतो. त्याचबरोबर आपल्या चाहत्यांशी तो नेहमीच मनमोकळेपणाने संवाद साधत असतो. नुकत्याच एका कार्यक्रमात एका व्यक्तीने त्याला हिंदू मुस्लिम मुद्द्यावर प्रश्न करत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रश्नाला देखील शाहरुखने (Shah Rukh Khan) असे काही उत्तर दिले की आता सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

या कार्यक्रमात एका व्यक्तीने शाहरुखला विचारले की तू एक चांगला मुस्लिम आहेस पण समजा तुझे नाव शेखर कृष्ण असते तर त्याला मध्येच थांबवत शाहरुख म्हणाला फक्त शेखर कृष्ण नव्हे तर शेखर राधा कृष्ण एसआरके असे शाहरुखचे बोलणे ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले. मग तो व्यक्ती पुढे म्हणाला “तू जर हिंदू असतास तर लोकांनी तुझ्याशी कसं वर्तन केलं असतं असे तुला वाटते”.

यावर उत्तर देताना शाहरुख (Shah Rukh Khan) म्हणाला, “माझ्या मते नावात काहीच ठेवलेले नाही तुमचे नाव काहीही असो काही फरक पडत नाही. हे आधी मला स्पष्ट करायचे आहे. माझ्या या सुंदर देशात मातृभूमीत व्यवसायामुळे किंवा धर्मामुळे लोक ओळखतात असे मला कधीच वाटले नाही. खरं तर अशा गोष्टी ऐकून मला त्रास होतो. कलाकारांचा स्वभावच असतो की तुम्ही किंवा कोणत्याही समाजातून आलात याने त्याला काहीच फरक पडत नाही. तुम्ही मला कोणताही नावाने हाक मारा मला अजिबात काहीच फरक पडत नाही आणि माझ्या स्वभावात देखील तुम्हाला बदल दिसणार नाही”.

आज शाहरुख खानचे वय 57 वर्ष असले तरी देखील तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत राहून चाहत्यांना वेड लावतो.
त्यामुळे त्याला बॉलीवूडचा किंग असे म्हणतात. शाहरुखने शून्यातून त्याचे हे संपूर्ण विश्व स्थापन केले आहे.
त्यामुळे चाहत्यांना त्याचा अभिमान वाटतो. आज शाहरुखचे भारताबरोबरच परदेशातही अनेक चाहते आहेत.
तर तब्बल 4 वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर झळकल्याने प्रेक्षक आनंदीत होते.
त्याच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढत नवे रेकॉर्ड स्थापित केले आहे.

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan answer on hindu muslim question goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhajinagar Accident News | शहरातील काम आटोपून घराकडे निघालेल्या दांपत्याचा अपघात

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

Pune Accident News | मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निमन दलाकडून सुटका