Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाबाबत शाहरुख खानने केला ‘हा’ मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आजवर जगभरात 946 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने नवीन विक्रम गाजवला आहे. तर आता या चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ या गाण्याचा बिहाइंड द सीन व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. जो आता सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॅकग्राऊंड डान्सरसह बॉस्को मार्टिसकडून कोरिओग्राफ केलेल्या डान्स स्टेपचा सराव करताना दिसत आहेत.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने आणि निर्मात्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. शाहरुख खानला या गाण्यात शर्टलेस करण्यासाठी निर्मात्याना आणि कोरिओग्राफरना कशा पद्धतीने परिश्रम करावे लागले याचा खुलासा त्यांनी केला आहे. शाहरुखला या गाण्यासाठी शर्टलेस व्हायचे नव्हते आणि तो आपल्या या निर्णयावर ठाम होता. पण गाण्यासाठी हे करणे गरजेचे होते त्यामुळे त्याला असे करायला भाग पाडण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी बरीच मेहनत घेतल्याचे या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे.

या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुखच्या (Shah Rukh Khan) शर्टलेस न होण्याच्या निर्णयावर बोलताना म्हणाले, “शाहरुख हा खूपच लाजरा आहे. त्यामुळे त्यांनी या गाण्या मध्ये शर्टलेस होण्यास नकार दिला होता. पण ती गाण्याची गरज असल्यामुळे त्याला असे करावे लागले”. यावर बोलताना शाहरुख म्हणाला “मी शर्टलेस व्हावे म्हणून तू मला काल पिझ्झा खायला घातला होतास”. तर कोरिओग्राफर बॉस्को सुद्धा शाहरुख खानला शर्टलेस होण्यासाठी विनंती करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर दोघांच्या या अथक परिश्रमानंतर शाहरुखने शर्टलेस होण्यास तयार झाला.

वर्षाच्या सुरुवातीलाच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
यशराज फिल्मच्या बॅनर खाली हा चित्रपट तयार झाला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून या चित्रपटात शाहरुख खान,
दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आजवर या चित्रपटाने जगभरात 946 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan big reveal about getting shirtless for pathaan song jhume jo pathaan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Swara Bhasker | स्वरा भास्करचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल; “आधी म्हटली होती भाई म्हणत…” नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने ठेवले शाहरुख खानच्या पावलांवर पाऊल ; ‘शहजादा’ चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झाला प्रदर्शित

Dhule Crime News | काळाने केला घात ! रुद्राक्ष महोत्सवाला जाताना स्कॉर्पिओच्या धडकेत नणंद भावजयीचा दुर्दैवी मृत्यू