Shah Rukh Khan | चाहत्याच्या ‘या’ मागणीवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर असेल किंवा या चित्रपटातील गाणी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे असे असताना देखील शाहरुखचे (Shah Rukh Khan) चाहते मात्र कमी दिसत नाहीत. दिवसेंदिवस शाहरुखचे चाहते हे त्याच्यावर प्रेम दाखवतच असतात. नुकताच शाहरुखच्या एका चाहत्यांनी केलेले ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शाहरुखचे भारतातच नाही तर भारताबाहेर देखील अनेक चाहते आहेत. कोणी मन्नत बाहेर त्याचे प्रेम दर्शवत असतात तर कोणी सोशल मीडियाद्वारे. अशाच पद्धतीने एका चाहत्यांनी शाहरुखला मेन्शन करत ट्विट केले की, “आम्हाला मुलगा किंवा मुलगी काही हो त्याचे नाव तूच ठेव प्लीज मला दोन्हीही नाव सांग”. चाहत्याच्या या ट्विटने शाहरुखचे लक्ष वेधले आणि त्याने यावर रिप्लाय करत म्हणाला, “आधी तुम्हाला बाळ होऊ दे मग त्याचं नाव आपण ठरवू…. तुझं आणि तुझ्या पत्नीचे अभिनंदन तंदुरुस्त रहा”.

सध्या शाहरुखने दिलेल्या या प्रत्युत्तराचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
तर त्याच्या या कमेंट वर चाहते कमेंट करून कौतुक करत आहेत.
शाहरुखने (Shah Rukh Khan) आवर्जून या पोस्टला रिप्लाय दिल्यामुळे चाहत्यांचे लक्ष या पोस्टवर जास्त वेधले जात आहे. तर शाहरुखच्या येणाऱ्या पठाण या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन इब्राहिम देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तर हा चित्रपट येत्या 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan gave reply to his fan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashami Desai | रश्मी देसाईच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढले सोशल मीडियाचे तापमान

Bhumi Pednekar | डीपनेक डिझायनर ब्लाऊज परिधान करत भूमी पेडणेकरने केले चाहत्यांना घायाळ