शाहरूख खाननं केलं गणपतीचं विसर्जन, चाहत्यांना ‘या’ फोटोमधून दिला खास संदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर काल दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावासह घरच्या घरी केले. याला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा अपवाद नव्हता. पूजाअर्चना केल्यानंतर शाहरुखने घरच्या गणपतीचे विसर्जन केले.

पूजा पार पडल्यानंतर त्याने सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. ब्लॅक अँड व्हाइट सेल्फी आणि शाहरुखच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा या सेल्फीत पाहायला मिळत आहे. हा सेल्फी पोस्ट करत शाहरुखने ‘पूजा आणि विसर्जन पार पडले आहे. गणपती बाप्पा तुमच्यावर आणि तुमच्या आप्तेष्टांवर, कुटुंबीयांवर आनंद आणि आशीवार्दांचा वर्षाव करो. गणपती बाप्पा मोरया!’ असे लिहले आहे. गणरायाचे आगमन, त्याच्यासाठी करण्यात येणारी सजावट, दर्शनाला येणारे सेलिब्रिटी तसेच विसर्जनाला असणारा जल्लोष  जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. शाहरुखच्या घरीही दरवर्षी गणरायाचे आगमन होते.