‘भाईजान’ सलमान नव्हे तर सौरव गांगुलीला पाहून किंग शाहरुखनं काढला होता शर्ट ! स्वत:च दिली होती कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) 2007 साली रिलीज झालेल्या आपल्या ओम शांति ओम या सिनेमातील दर्द ए डिस्को गाण्यात शर्टलेस दिसला होता. काहींना असं वाटत होतं की, त्यानं सलमान खानला पाहून असं केलं होतं. परंतु या अवतारामागे दादा म्हणजेच सौरव गांगुली चा हात होता. खुद्द शाहरुखनंच एका कार्यक्रमात ही गोष्ट मान्य केली होती.

या कार्यक्रमात सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, शोएब अख्तर आणि एस श्रीसंत असे अनेक दिग्गज क्रिकेटर्स उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आधी तर शाहरुखनं सचिनचं आणि त्याच्या महानतेचं खूप कौतुक केलं. परंतु बोलताना मध्येच त्याला सौरव गांगुलीची आठवण झाली आणि तो म्हणाला, दादा कुठंय ? ते इथं आहेत का ? वापसी कशी केली जाते हे कुणी दादाकडून शिकत असावं. दादा महान आहेत.

पुढं बोलताना शाहरुख म्हणाला, मी आताच सांगितलं की, एक नवा सिनेमा केला आहे. ओम शांति ओम. मी त्या गाण्यात शर्ट काढण्याचा निर्णय तुम्हाला पाहून घेतला होता. हे सलमान खानमुळं नाहीये. तुमच्यामुळं मी शर्ट काढला आहे. मी तुम्हाला असं शर्ट काढताना पाहिलं आहे. मीही ठरवलं होतं मीही असंच कधी शर्ट काढेन. हे ऐकल्यावर सौरवनं त्याला स्माईल दिली. शाहरुख असंही म्हणाला की, तुम्हा लोकांकडून खूप काही शिकलो आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे. याआधीही ही जोडी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू ईयर अशा सिनेमात सोबत दिसली आहे.