Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यावर ‘या’ कारणामुळे भडकले प्रेक्षक; ‘गाण्यातून अश्लिलतेचं प्रदर्शन…’

पोलीसनामा ऑनलाइन : Shah Rukh Khan | यंदाच्या वर्षी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी बॉयकॉट करून त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. यामुळे अनेक चित्रपटांना पाहिजे तसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे चित्रपट चांगली कमाई देखील करू शकले नाही. अजूनही बॉयकॉट हे सत्र चालूच आहे. तर आता सोशल मीडियावर Boycottpathaan हा हॅशटॅग जोरात चालल्याचे दिसत आहे. (Shah Rukh Khan)

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही दिवसाआधीच या चित्रपटाच्या ट्रेलरवर सगळ्या प्रेक्षकांनी बहिष्कार टाकला होता. तर आता नुकताच या चित्रपटातील गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. आता अनेकांनी या गाण्यावर आक्षेप घेत ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी समोर येत आहे. (Shah Rukh Khan)

या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुकही केले होते. त्याचबरोबर आता या गाण्यातून अश्लिलतेचं प्रदर्शन केलं जात असल्याचा आरोप करत, आता या गाण्यावर त्याचबरोबर चित्रपटावरही बहिष्कार टाकण्यात यावा अशी विनंती प्रेक्षकांकडून होत आहे. तर आता पुन्हा या बहिष्कारचा फटका पठाण चित्रपटाला बसणार का हे लवकरच समोर येईल. ‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले. 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :- Shah Rukh Khan | social media users demanding boycott pathaan after seeing its first song

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘आज पुणे बंद आहे, हळूहळू महाराष्ट्र बंद होईल; पुणे बंदची दखल केंद्र सरकारने घ्यावी’ – संजय राऊत

Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना