‘मी मुसलमान, पत्नी हिंदू आणि माझे मुलं हिंदुस्थानी’, धर्मावर बोलताना ‘किंग’ खान शाहरूखनं सांगितलं, Video झपाट्यानं ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवुड स्टार शाहरूख खान नुकताच डान्स रियालिटी शो डान्स प्लस 5 मध्ये सहभागी झाला होता. यावेळी तो आपल्या मुलांच्या धर्माबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलला. सोशल मीडियावर शाहरूखचा हा व्हिडिओ सध्या खुप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरूख खाने म्हटले आहे की, माझी पत्नी हिंदू आहे, आणि मी मुसलमान आहे, आणि माझी मुलं हिंदुस्तान आहेत. अनेकदा शाळेत एक फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये धर्म लिहावा लागतो. माझी मुलगी छोटी होती तेव्हा एक दिवस ती माझ्याकडे आली आणि तिने मला विचारले की, पापा आपला धर्म कोणता आहे, तेव्हा मी फॉर्ममध्ये लिहिले की आम्ही इंडियन आहोत. मग कोणत्या धर्माचा प्रश्नच येत नाही. शाहरुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. लोक भरभररून यावर बोलत आहेत आणि पसंती दर्शवत आहेत.

शाहरुख खान नेहमी सणाच्या निमित्ताने फोटो शेयर करत असतो. तो ईद आणि दिवाळीला जल्लोष साजरा करताना दिसतो. मागच्या वर्षी त्याच्या घरातील गणेशोत्सवातील श्री गणेशाच्या मूर्तीसोबतच्या अबरामचा फोटोने अनेकांचे लक्ष वेधले होते. शाहरुखने फोटो शेयर करून फॅन्सला सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ईदनिमित्तही तो मुलासोबत दिसला होता.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like