‘किंग’ खाननं खरेदी केले ‘या’ सिनेमाचे राईट्स, साकारणार ‘मर्डर डिटेक्टीव’ची भूमिका ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून पडद्यापसून दूर आहे. असं असतानाच आता ताज्या रिपोर्टनुसार, शाहरुख खाननं कोरियन सिनेमा ‘A Hard Day’ चे राईट्स खरेदी केले आहेत.

एका रिपोर्टनुसार, शाहरुखानं आपल्या टीममधील एकाला प्रीप्रॉडक्शनची जबाबदारी दिली आहे. शाहरुख या सिनेमात रोल करणार आहे किंवा नाही हे अद्याप समजलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख कॅमेऱ्याच्या मागेच काम करताना दिसत आहे. त्यानं ‘बदला’ आणि ‘बार्ड ऑफ ब्लड’ यांसारख्या सिनेमांसाठी काम केलं आहे. परंतु स्क्रिनवर तो एकदाही दिसला नाही. 2019 मध्ये शाहरुखचा एकही सिनेमा आलेला नाही.

जर शाहरुखनं ‘A Hard Day’ सिनेमात काम केलं तर तो मर्डर मिस्ट्री डिटेक्टीवचा रोल करण्याची जास्त शक्यता आहे. या व्यक्तीच्या गाडीखाली एकाचा अपघात होतो असं सिनेमात दिसत आहे. यावेळी तो हा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

शाहरुख खान घेतोय ब्रेक
गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचे काही सिनेमे सतत फ्लॉप होताना दिसत आहेत. यानंतर शाहरुख आता ब्रेक घेत आहे. आता त्याचा आगामी सिनेमा कोणता असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं म्हटलं जात होतं की, जानेवारीत शाहरुख आपल्या सिनेमाची घोषणा करू शकतो. परंतु असं काही झालं नाही. शाहरुखनं ट्विट करत सांगितलं होतं की, तो स्वत: सिनेमाची घोषणा करेल.