Shahaji Maharaj | कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर वाद सुरू आहेत, तर दुसरीकडे एका मुद्यावर दोनही राज्यांचे संगनमत झाले आहे. कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या (Shahaji Maharaj) समाधी स्मारकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारसोबत हातमिळवणी करणार आहे. त्यासंबंधी उच्च व तंज्ञशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. शहाजी महाराजांच्या (Shahaji Maharaj) समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारप्रकरणी लवकरच चंद्रकांत पाटील कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

शहाजी महाराज यांचा मृत्यू 23 जानेवारी 1664 रोजी कर्नाटक राज्यातील होदिगेरे जिल्ह्यात झाला. याच ठिकाणी शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. शहाजी महाराजांची समाधी कर्नाटकात उघड्याबोडक्या अवस्थेत आहे. शहाजी महाराजांसोबत कर्नाटकात गेलेल्या काही मराठ्यांचे वशंज आजदेखील या समाधीस्थळाला भेटी देतात. शहाजी महाराजांचे (Shahaji Maharaj) समाधी स्थळ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या यादीत असले तरीही या स्थळाचा विकास मात्र झाला नाही. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. याकडे महाराष्ट्र सरकारने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच, समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, लवकरच चंद्रकांत पाटील कर्नाटक सरकारकडे या प्रकरणी प्रस्ताव सादर करणार आहेत.

मागील काही दिवस कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोट आणि सांगलीमधील काही गावांवर दावा
केला होता. त्यामुळे हा वाद पेटला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून सीमा
भागांतील गावांसाठी विशेष निधी आणि सुविधांची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे आता शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पावले उचलली आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सरकार शांततेच्या मार्गाने कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची तयारी करत आहे.

Web Title :- Shahaji Maharaj | maharashtra mulls joint shahaji maharaj memorial with karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे