मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shahajibapu Patil | बीकेसी मैदानावरील (BKC Ground) दसरा मेळावा (Dasra Melava) यशस्वी करण्यासाठी शिंदे गटातील (Shinde Group) सर्व आमदार कामाला लागले आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार आता मुंबईत दाखल होऊ लागलेत. आमदार शहजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे सुद्धा आज मुंबईत आल्यानंतर दसरा मेळाव्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना (Shivsena) आमचीच आहे, आमचाच दसरा मेळावा खरा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. यंदाचा दसरा मेळावा माझ्या जीवनातला हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे मी समजतो, असे शहाजी पाटील म्हणाले.
शहाजी पाटील म्हणाले, यावर्षी दसरा मेळाव्याला एक वेगळे स्वरूप आलेले आहे. दोन मेळावे होत आहेत, एक बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात होत आहे तो हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा आहे. तर, ज्यांनी दिवस रात्र जीवाची पर्वा न करता शिवसेना वाढवली त्या आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या अस्मितेचा मेळावा होत आहे. तर., दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली, अशा शिवसेनेच्या तो मेळावा आहे.
शहाजी पाटील (Shahajibapu Patil) पुढे म्हणाले, आज सकाळी मी एक टीझर पाहिला, टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे एक वाक्य आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात आणि निघून जातात.
आम्ही शिवसेनेतून गेलोच नाही, शिवसेनाच आमची आहे जे मागे राहिलेत त्यांनी असा विचार करावा.
जे तुटपुंज गबाळ राहिलं ते ते घेऊन मागे राहायचं का भरदिशी आमच्यात येऊन मिसळायचं हा त्यांचा खरा मनाचा मोठेपणा आहे.
पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही खरी शिवसेना आहे.
हे 50 आमदार आणि बारा खासदारांनी सिद्ध केले आहे.
सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आणि तळागाळातला शिवसैनिक शिंदे साहेबांकडे यायला लागला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही शिंदेंच्या मागे खंबीरपणे उभी आहे, फडणवीसांच्या पाठीशी उभी आहे.
Web Title :- Shahajibapu Patil | shivsena is ours this years dussehra gathering is the biggest event of my life shahaji bapu patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत
Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क