Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shahajibapu Patil | शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरात आज एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यार जोरदार घणाघात करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, शिंदे यांनी काढलेल्या धर्मवीर चित्रपटात (Dharamveer movie) एक चटकदार वाक्य आहे ते असे की, राजकारणात सगळेच सारखे नसतात. काही आनंद दिघे (Anand Dighe) असतात. त्याच धर्तीवर आता सांगता येईल की, सगळ्यांनाच दिघे बनता येत नाही. काही शिंदेही बनतात. शिंदे यांचा दसरा मेळावा (Dasra Melava) म्हणजे चोरांचे संमेलन ठरेल. त्यात दिघेंचे नाव घेणे हा त्या पुण्यवान माणसाचा अपमान ठरेल. शिवसेनेच्या या टीकेनंतर शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांनी म्हटले की, सगळेच आनंद दिघे नसतात, हे बरोबरच आहे. पण त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे कार्य पुढे तेवढ्याच जोमाने आणि निष्ठेने चालवणारा पण एखादाच एकनाथ शिंदे असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. बीकेसी मैदानात (BKC Ground) मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जो मेळावा होत आहे तो शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचारांचा आणि ज्यांनी दिवस-रात्र जीवाची परवा न करता शिवसेना वाढवली त्या आनंद दिघे यांच्या अस्मितेचा मेळावा होत आहे. दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली अशा लोकांचा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे.

 

सामनाच्या आजच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, शिवतीर्थावरचा (Shivtirtha) मेळावाच खरा, हे देश जाणतो, पण शिंदे गट (Shinde Group) त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ’दिघे’ होता येत नाही. काही जण ’शिंदे’ होतात. शिंदे हे आनंद दिघ्यांचे शिष्य शोभतील काय?

आज ते शिवसेनेचा समांतर दसरा मेळावा घ्यायला निघालेत. चार हजार एसटी गाड्या गर्दी जमवण्यासाठी भाड्याने घेणार आहेत.
पुन्हा इतर खर्च वेगळाच. कुठून येते ही आर्थिक ताकद? आनंद दिघे यांना हे उपद्व्याप कधीच करावे लागले नाहीत.
त्यांना मोह नव्हता. त्यांची शिवसेना निष्ठा हे ढोंग नव्हते. ते खरेच मनाने व कर्तृत्वाने महान होते.
दिघे धार्मिक होते…अघोरी नव्हते. दिघे वायफळ बोलत नव्हते.

 

माणसे विकत घेऊन राजकारण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. दिघे कुणी तत्त्वज्ञ नव्हते.
गरीब, अन्यायग्रस्तांना मदत करणारा ते मसिहा होते.
आनंद दिघे यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती, पण त्यांच्या त्यागाची व निष्ठेची कवने संपूर्ण राज्यात गायली जात होती.
दिघे माणसांना ’पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत,
अशी घणाघती टीका रोखठोकमधून शिवसेनेने केली आहे.

 

Web Title :- Shahajibapu Patil | shivsena rebel mla shahaji patil eknath shinde hits back to uddhav thackeray saamana rokhathok

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mushtaq Ali T20 | विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याच्या अथर्व तायडेची निवड

 Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क