Shahapur Nagar Panchayat Election | शहापूर नगर पंचायत निवडणूक ! शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जादूटोणा; परिसरात उडाली खळबळ

कसारा : पोलीसनामा ऑनलाइन – Shahapur Nagar Panchayat Election | समाजात आजही अनिष्ट रूढी परंपरांचे स्तोम जाणवत असते. 21 व्या शतकाकाकडे जात असताना अघोरी प्रकरणांना आळा घालू शकलो नाही, हे वास्तव आहे. राजकीय व्यक्तीही धार्मिक कर्मकांडापासून दूर झाल्या नाहीत. काही जण तर चक्क नवस बोलतात. मात्र आता शहापूर (Shahapur News) येथे विचित्र अशी घटना समोर आली आहे. शहापूर नगरपंचायतीच्या चार जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणूक (Shahapur Nagar Panchayat Election) होणार असून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात काटे कि टक्कर होणार आहे. मात्र तत्पूर्वीच अज्ञाताने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होण्यासाठी जादूटोणा (Blackmagic) सारखे अघोरी कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

शहापूर नगरपंचायतीची निवडणूक (Shahapur Nagar Panchayat Election) झाली होती. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. दोन्हीचाही निकाल एकत्रित जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र आता ज्या उमेदवारांना विजयाची खात्री नाही अशांनी म्हणा की त्यांच्या हितचिंतकांनी विरोधकांचा प्रभाव होण्यासाठी वेगवेगळी अघोरी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. पठाणवाडा येथील पिपंळाच्या झाडाखाली शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होण्यासाठी जादूटोणा (Blackmagic) सारखा अघोरी प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.

 

शिवसेनेच्या उमेदवार रजनी संतोष शिंदे (Rajni Santosh Shinde), मालती म्हात्रे (Malati Mhatre), विजय भगत (Vijay Bhagat), जान्हवी देशमुख (Janhvi Deshmukh) (काँग्रेस), या सह अन्य दोन उमेदवारांच्या नावाने चिठ्या बनवून त्यावर उमेदवाराचे फोटो व निशाणी व त्या पुढे यांची हार होऊ दे असे लिहिलेले आहे. त्यावर बराच उतारा करून त्या चिठ्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या होत्या. आज सकाळी काही स्थानिकांना त्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्याचबरोबर तेथे काही तरी पेटवल्याचेही निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते. शिवसैनिकांच्या ही बाब लक्षात येताच सर्वांनी धाव घेत या घटनेचा निषेध केला. शिवाय विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असून जनतेने शिवसेनेला कौल दिला असल्याने विरोधक बेचैन झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी दिली.

 

Web Title : Shahapur Nagar Panchayat Election | black magic defeat shiv sena candidates shahapur nagar panchayat elections

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा