प्रसिध्द अभिनेता शाहबाज खान विरूध्द FIR, युवतीची छेडछाड केल्याचं प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध टीव्ही आणि फिल्म अ‍ॅक्टर शाहबाज खानविरोधात मुंबई पोलिसांनी छेडछाड केल्याबद्दल केस दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याविरोधात एका टीनेजर मुलीनं छेडछाड केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. एएनआयच्या माहितीनुसार, ओशिवारा पोलीस ठाण्यात शाहबाज विरोधात आयपीसी मधील कलम 354, 509 नुसार FIR दाखल करण्यात आली आहे. शाहबाजला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

बॉलिवूडमधील अनेक सिनेमात शाहबाजनं निगेटीव रोल प्ले केला आहे. शाहबाजनं राजू चाचा, चल मेरे भाई, बादल, जय हिंद, मेहंदी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. छोट्या पडद्याबद्दल बोलायचं झालं तर शाहबाजनं सीआयडी, नीयत, युग, आम्रपाली आणि रावण यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.