पुजेसाठी बससलेल्या ‘शगुफ्ता-शिवानी’नं वाचलं ‘कलमा’, ‘शाहीन बाग’मध्ये कपड्यावरून ओळखण्याचं ‘आव्हान’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात सीएएच्या विरोधात मागील दोन महिन्यांपासून धरण आंदोलन सुरु आहे. सरकार विरोधी नारेबाजी आणि संविधान वाचवण्यासाठी इतर आंदोलनाच्या ठिकाणी रोज नवी नवी नारेजाबी होताना दिसत आहे. गुरुवारी देखील असेच झाले.

पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका निवडणूक रॅलीत सांगितले की सीएए आणि एनआरसीच्या विरोधात जे आंदोलन सुरु आहे त्यांना कपडे पाहून ओळखले जाऊ शकते की हे आंदोलन कर्ते कोण आहेत. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला परंतु याला अल्पसंख्यांक विशेष करुन मुसलमानांवर कमेंट मानले गेले. गुरुवारी शाहीन बागमध्ये पीएम मोदींच्या या वक्तव्याला आव्हाण देणारे दिसले.

गुरुवारी सर्व धर्म (हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई) लोकांनी आपापल्या धर्माचे पूजा पठण आणि प्रार्थना केली. या दरम्यान सर्व लोकांनी एक दुसऱ्यांची मदत केली. एकीकडे शगुफ्ता यांनी पूजा पठनासह मंत्राचे पठन करण्यात आले, तेथे उपासना आणि शिवानी यांनी कलमा वाचले. याशिवाय शिख आणि ईसाई धर्मांच्या लोकांनी देखील सर्व धर्मांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

जश्न-ए-एकतामध्ये लोकांचा अंदाज बदलला. हिंदूंनी टोपी घातली तर मुस्लिम महिलांनी साड्या घातल्या. काही लोकांनी डोक्यावर पगडी घातली. कार्यक्रमानंतर प्रदर्शन करणाऱ्या महिलांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शाहीन बाग येण्यासाठी आमंत्रण देत सांगितले की या आणि आमच्या कपड्याने आम्हाला ओळखा. आंदोलकर्त्यांनी सांगितले की आम्ही हिंदुस्तानी आहोत, आम्हाला धर्माच्या नावे विभागण्याचा प्रयत्न करु नका.

जश्न-ए-एकतामध्ये उपस्थित आंदोलनकर्त्यांनी सांगितले की येथे शाहीन बागमध्ये मुसलमान लोक नाहीत तर गुरमीत, राम, रहीम देखील आहेत. शाहीन बागेत पंजाबी आणि हिंदु, ईसाई समुदायाचे लोक देखील उपस्थित आहेत. शाहीन बागमध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की सरकार जोपर्यंत नागरिकत्व संशोधन कायदा परत घेणार नाही आम्ही या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उभे राहू.