‘शाहीन बाग’ आंदोलनकर्त्यांंचे PM मोदींना ‘व्हॅलेंटाईन डे’ गिफ्ट !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबागेत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी येथे येऊन आमच्यासोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा, असे आमंत्रण दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोस्टर्स लावण्यात आले असून सोशल मिडियावरही हे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या, तुमचं गिफ्ट घ्या आणि आमच्याशी बोला असे वाक्य या पोस्टरवर लिहिले आहे. आजच्या दिवशी आंदोलनकर्ते पंतप्रधान मोदींसाठी एक प्रेमगीत आणि सरप्राइज भेट ही सादर करणार आहेत.

शाहीर बागेतील आंदोलकर्ता तासीर अहमद म्हणाले की, पंतप्रधान मोदी असो अथवा गृहमंत्री अमित शहा किंवा इतर कोणी, ते येऊन आमच्याशी बोलू शकतात़ जर ते आम्हाला समजावून सांगतील की जे घडत आहे ते घटनेच्या विरोधात नाही तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ़ सरकारच्या दाव्यानुसार सीएए एखाद्याचे नारिकत्व देतही नाही आणि घेतही नाही़ मग ते देशासाठी कसे उपयुक्त ठरेल, हे कोणी सांगत नाही.