देशभरात सोमवारी साजरी केली जाणार ईद, इमाम बुखारींनी केली घोषणा

दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी आणि फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम यांनी घोषणा केली आहे की कोठुन पण चंद्र दिसण्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे ईद (Eid ul Fitr) ही सोमवारी होणार आहे. व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर इमाम यांनी लोकांना ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. ईद घरी राहूनच साजरी करावी असं सांगण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये मशिदीत सर्वसामान्य लोकांना जाण्यास बंदी असल्याने काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे.