जेव्हा मुलीने आरती केल्यावर आफ्रिदीनं तोडला होता TV, कनेरियासोबत देखील केला भेदभाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर डॅनिश कनिरियाने शाहिद आफ्रिदीवर त्याच्या कारकीर्दीच्या दरम्यान भेदभाव व गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. कनेरियाने देखील सांगितले की, आफ्रिदीने धर्मापलीकडे केलेल्या या भेदभावपूर्ण वागण्यामागील कारणाचा विचार करणे अवघड आहे. याआधी देखील पाकिस्तानी माजी गोलंदाज शोएब अख्तरने गैर-मुस्लिम (हिंदू) खेळाडूंविरूद्ध भेदभाव केल्याच्या विधानामुळे खळबळ उडाली होती.

शोएब अख्तरने एका कार्यक्रमात सांगितले होते की, हिंदू खिलाडी दानिश कनिरियासोबत संघाचे इतर खेळाडू जेवायलासुद्धा घाबरत होते. यामध्ये शाहिद आफ्रिदीची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यावरून स्पष्ट दिसून आले होते की, त्यांच्या मनात हिंदू धर्म आणि त्यांच्या प्रथेविषयी किती तिरस्कार आहे.

एका मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा जेव्हा त्याने आपल्या मुलीला घरी आरती करताना पाहिले तेव्हा रागाच्या भरात त्याने टीव्ही तोडला होता. मुलाखतीदरम्यान आफ्रिदी देखील हिंदू प्रथेची खिल्ली उडविताना दिसला होता.

पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या होस्टला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने हिंदूंच्या आरतीची थट्टा केली होती. आफ्रिदी मुलाखतीत सांगितले की, बेगममुळे त्याने आपल्या घरातला टीव्ही तोडला कारण ती भारतीय टीव्ही चॅनेल स्टार प्लसवर शो पाहत होती. त्यावेळी मुलेही पाहत होते.

एके दिवशी टीव्ही सीरियल पाहिल्यावर त्याची मुलगी हातात प्लेट घेऊन आरती करताना दिसली, ज्यामुळे त्याला इतका राग आला की त्याने भिंतीवरील टीव्ही तोडला. त्याशिवाय आफ्रिदीने ऑटोबायोग्राफीत म्हटले आहे की, सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे मुलींना क्रिकेट खेळू देऊ इच्छित नाही.

आफ्रिदीचे म्हणणे आहे की, आपल्या मुलींनी क्रिकेटमध्ये करियर बनवावे अशी त्यांची इच्छा नाही. आफ्रिदीच्या चार मुली अकसा, आसमारा, अंशा आणि अजवा आहे. आफ्रिदी म्हणाला की, ‘अशी अनेक सामाजिक आणि धार्मिक कारणे आहेत, ज्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. माझी पत्नी नाडिया देखील सहमत आहे. एक कट्टरपंथी पाकिस्तानी वडील म्हणून मी हे ठरविले आहे.